योगासन

योगासन
Published on

योगासन

पद्मासनयुक्त चक्रासन

या आसनाचा सराव करण्यापूर्वी चक्रासन व पद्मासन या दोन्ही स्थिती व्यवस्थित जमणे आवश्यक आहे.

कृती
- प्रथम पद्मासन घालून पाठीवर झोपावे, त्यानंतर चक्रासन करताना जसे हाताचे तळवे खांद्याजवळ टेकवतात, त्याचप्रमाणे टेकवावेत व हळूहळू हातावर जोर देऊन पाठ वर उचलावी.
- मग डोके, कंबर, मांडी जमिनीपासून वर उचलावे. शरीराचा भार दोन्ही गुडघे व हातांच्या तळव्यावर असावा.
- छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे आसनस्थिती घेण्याचा प्रयत्न करावा.
- आसन पूर्ण झाल्यानंतर श्वसन संथ सुरू ठेवावे. आसन सोडताना सावकाश उलट क्रमाने सोडावे व पवनमुक्तासन करावे. त्यामुळे कमरेवर आलेला ताण कमी होईल.

लाभ
गुडघे, पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. संपूर्ण शरीराला उत्तम ताण बसल्याने रक्ताभिसरण सुधारते.

काळजी
ज्यांना गुडघेदुखी, घोटादुखी असेल, खांद्याचे, मानेचे त्रास असतील, त्यांनी हे आसन करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com