केडगावातील पद्मावती मंदिराचे सुशोभीकरण

केडगावातील पद्मावती मंदिराचे सुशोभीकरण
Published on: 

केडगाव, ता. १२ : केडगावचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन पद्मावती मंदिर परिसराचा जीर्णोद्धारामुळे कायापालट झाला आहे. आकर्षक रंगरंगोटी, सभामंडपाचा विस्तार आणि सुशोभीकरणामुळे मंदिराला भव्य स्वरूप प्राप्त झाले असून, नवरात्रोत्सवासाठी मंदिर सज्ज झाले आहे. देवीचा गजर करत काल घटस्थापना झाली.
आमदार राहुल कुल यांनी या परिसराचा विकास करण्यासाठी एक कोटी रुपयांचा विकास निधी दिला आहे. मंदिर पुरातन असले, तरी त्याचा इतिहास आणि वैशिष्ट्यांची माहिती अनेक ग्रामस्थांना नाही. मंदिराच्या शिखरावर नवदुर्गांच्या मूर्ती, त्यावर अष्टविनायकाच्या मूर्ती तसेच गरुडाची मूर्ती साकारण्यात आली आहे. आकर्षक रंगरंगोटीमुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे. सभामंडपाचा विस्तार झाल्याने मंदिर अधिक भव्य दिसत असून, भाविकांसाठीही प्रशस्त जागा उपलब्ध झाली आहे, अशी माहिती अरुण देशमुख यांनी दिली.
पूर्वी मंदिरात देवीचा तांदळा होता. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत मंदिरात देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. लोकवर्गणी आणि आमदार निधीतून मंदिराच्या विकासाची कामे मार्गी लागली आहेत.
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देवीची आरती, हरिपाठ, देवीची गाणी, कीर्तन, देवीचा जागर आणि होम आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. निधीतून सभामंडप, दोन एकर जागेला संरक्षित भिंत, फरशी, ब्लॅाक, प्रवेशद्वार, डांबरी रस्ता आदी कामे करण्यात आली आहेत. १६ लाख रुपयांची लोकवर्गणी झालेली आहे. किसन शंकर शेळके यांनी पत्राशेडला आर्थिक मदत केली आहे तर संतोष भीमराव कांबळे यांनी मंदिराच्या भिंतींवर लावण्यासाठी दगडी फरशीसाठी आर्थिक मदत केली आहे. मंदिरालगत बारव होती. गावातील लोक पूर्वी याच बारवेचे पाणी पित असत. या बारवेची स्वच्छता केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com