पहाट गाणी कार्यक्रम बातमी

पहाट गाणी कार्यक्रम बातमी
Published on: 

SLC26B30709
फोटोओळ :
सोलापूर : तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयाच्या ‘पहाट गाणी’ कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर.

तेलुगु, मराठी, कन्नड गीतांनी पहाट रंगली
तेलुगु ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम; रसिकांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर : मार्कंडेय उद्यान येथे तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे बुधवारी (ता. ११) ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात झाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तेलुगु तल्ली प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
गायिका साईभव्याश्री, अनुराधा गंगूल, देवता सुधाकर यांच्यासह श्रीनिवास, कोटी, मुरली व गोवर्धन कमटम यांनी विविध गीते सादर केली. ‘कानडा विठ्ठला’, ‘तेनेकैना तियनिधी’, ‘अदिगो अल्लरीगो’ आणि ‘प्रभाते कर दर्शनम’ या तेलुगु, मराठी व कन्नड गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. मेलडी स्टार्स ऑफ जब्बार अँड ग्रुप्स यांनी संगीताची साथ दिली. धनंजय अंबेकर यांनी वादन केले.
या कार्यक्रमासाठी ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम, उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंदूल, सचिव तिपण्णा गणेरी, सहसचिव प्रभाकर भिमनाथ, संजीव नादरगी, शंकर चौगुले व ग्रंथपाल विजयालक्ष्मी गुडुर यांनी परिश्रम घेतले. श्रीनिवास क्यातम, व्यंकटेश गुंडेली, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कवयित्री रेणुका बुधारम यांनी केले. नरेंद्र गुंडेली यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.