

He Was Heading Home, But Never Returned; Painter Dies in Horrific Road Mishap
sakal
लोणी काळभोर, (पुणे) : दुचाकीवरून घरी परतत असलेल्या एकास भरधाव वेगाने आलेल्या हायवा डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत्यूमुखी पडला आहे. सदर अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर मंगळवार (२ मे) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारांस कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरात झाला आहे.