पुणे : ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन

painter Ravi Paranjape passed away
painter Ravi Paranjape passed awaypainter Ravi Paranjape passed away

पुणे : रंग-रेषांच्या चतुरस्र कलाकर्तृत्वाने अवघ्या विश्वाला मोहिनी घालणारे ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे (८७) त्यांचे पुण्यात शनिवारी (ता. ११) निधन झाले. अंत्यदर्शन त्यांच्या मॉडेल काॅलनीतील निवासस्थानी दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत घेता येईल. काही दिवसांपासून ते पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. (painter Ravi Paranjape passed away)

१९३५ मध्ये बेळगावात जन्मलेले परांजपे जगभरात बोध चित्रकार म्हणून सुप्रसिद्ध आहे. जहिरात आणि प्रकाशन या क्षेत्रात महत्त्वाची ठरणारी बोधचित्रकला, लावण्य योजना कला (डिझाईन), वास्तुबोधचित्रकला आणि स्वान्त सुखाय सृजनात्मक चित्रनिर्मिती अशा चित्रकलेच्या विविध अंगांना स्पर्श करीत गेली अनेक वर्षे चित्रकार रवी परांजपे, आपल्या वैविध्यपूर्ण चित्रनिर्मितीमध्ये त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचा, प्रज्ञेचा व अभ्यासपूर्ण चिंतनाचा प्रत्यय देत आले आहे.

परांजपे यांनी १९६६ ते ६९ या काळात नैरोबी (केनिया) येथील जाहिरात क्षेत्रात केलेली उत्तुंग कामगिरी, दक्षिण कोरियातून प्रसिद्ध होणाऱ्या इटरनॅशन डिझाईन जर्नल या मासिकाने त्यांचा केलेला सनामास अमेरिकन आर्टिस्ट्स अकॅडमीतर्फे जाहीर झालेला जागतिक पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वाचा आवाका स्पष्ट करतो. परांजपे यांनी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले आहे. फेब्रुवारी २०२२मध्ये त्यांना द बॉम्बे आर्ट सोसायटी’तर्फे रूपधर हा चित्रकला क्षेत्रातील प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता.

painter Ravi Paranjape passed away
सरकार किमान चालवून तरी दाखवा, देवेंद्र फडणवीसांचा टोला

पुस्तके

  • तांडव हरवताना

  • नीलधवल ध्वजाखाली (लेखसंग्रह)

  • ब्रश मायलेज (आत्मकथन)

  • शिखरे रंग रेषांची (परदेशी चित्रकारांचा परिचय ग्रंथ)

सन्मान आणि पुरस्कार

  • ‘कम्युनिकेशन आर्ट्‌स गिल्ड हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार

  • ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला मिळालेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार (२०१२)

  • दयावती प्रतिष्ठानचा पुरस्कार

  • ‘ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्कार

  • शारदा ज्ञानपीठम्‌‍कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून पूजन (६-९-२०१६)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com