पखालपूर गणपतीसाठी एसटी बस धावणार
पखालपूरच्या दर्शनासाठी एसटी बसची सोय
..........
पंढरपूर : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मागणीप्रमाणे प्रत्येक संकष्टी चतुर्थी दिवशी श्रीक्षेत्र पखालपूर येथे जाण्यासाठी पंढरपूर एसटी आगारातून सकाळी ७ पासून एसटी बसेसची सोय करण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख योगेश लिंगायत तसेच ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
गुरुवारी (ता. ५) संकष्टी चतुर्थीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी पंढरपूर आगाराने जुन्या बस स्थानकातून एसटीची सेवा उपलब्ध करून दिली आहे. भाविकांनी एसटी बसने प्रवास करून श्रीक्षेत्र पखालपूर येथील श्रीगणेशाचे दर्शन घ्यावे असे आवाहन स्थानक प्रमुख अंकुश सरगर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल, सदस्य विनोद भरते, सुभाष सरदेशमुख, जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा सचिव सुहास निकते, उपाध्यक्ष विनय उपाध्ये, तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे, उपाध्यक्ष प्रशांत माळवदे आदींनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

