पालखी अंगावरून नेण्याची प्रथा बंद

पालखी अंगावरून नेण्याची प्रथा बंद
Published on: 

पालखी अंगावरून नेण्याची प्रथा बंद
यात्रेत जमिनीवर झोपून पालखी अंगावरून नेण्याची प्रथा भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय भिगवण पोलिस प्रशासन आणि यात्रा कमिटीने घेतला होता. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने यात्रा निर्विघ्नपणे पार पडली. यात्रेच्या नियोजनासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा कमिटी व ग्रामस्थांची बैठक झाली होती. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पालखी, ढोल आणि सासनकाठ्या नेताना जमिनीवर झोपण्याच्या प्रथेमुळे संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही प्रथा बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला होता. यात्रेदरम्यान ग्रामस्थ आणि भाविकांनी या निर्णयाचे काटेकोर पालन केले. पालखी व सासन काठ्यांचे स्वागत शिस्तीत पार पडले. श्रद्धा जपत असताना स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये, या प्रशासनाच्या आवाहनाला भाविकांनी प्रतिसाद दिला.
यात्रेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बीट अंमलदार सचिन भस्मे, पोलीस पाटील तुषार झेंडे, तंटामुक्ती अध्यक्ष साळंखे, मोहिते, सरपंच राजेंद्र राऊत, उपसरपंच रमेश चांदगडे, आण्णा चांदगुडे, संदीप चांदगुडे, यात्रा कमिटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी सहकार्य केले. सुरक्षिततेला प्राधान्य देत यात्रा यशस्वी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.