
कात्रज : किल्ले राजगड (ता .वेल्हे) येथील गडावर जाणाऱ्या मुख्य मार्गावरील पाली दरवाज्यावर नुकताच बसविलेल्या लाकडी दरवाजा (कवाडे) रविवारी सकाळच्या सुमारास कोसळला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती किल्ल्याचे पुरातत्व विभागाचे कर्मचारी पहारेदार बाप्पू साबळे यांनी दिली आहे. किल्ल्यावरील बसवण्यात आलेला लाकडी दरवाजा कोसळल्याची बातमी समाज माध्यमांवर पसरली असता शिवशंभु प्रतिष्ठाण, बारा मावळ प्रतिष्ठानकडून महेश कदम, सचिन खोपडे देशमुख, नवनाथ पायगुडे, आनंदराव जाधव, संतोष आलम यांनी पुरातत्व खात्याच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शिवशंभु प्रतिष्ठान कात्रजचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून लाकडी दरवाजा बसवण्याच्या अगोदर शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने फेब्रुवारी २०२२मध्ये ज्या ठिकाणी सागवानी दरवाजे (कवाडे) बसवण्यात येणार आहेत त्या ठिकाणचे किल्ल्याचे मूळ अवशेष सुस्थितीत आहेत की नाही? गडाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे का नाही? येथील अवशेष शेकडो किलो वजनाचे कवाडे पेलतील का? असे प्रश्न उपस्थित करत या मजबुतीचा अहवाल माहिती अधिकारात मागविला होता परंतु, याबाबत पुरातत्व विभागाने कोणतेही उत्तर न देता ज्या पुरावशेषांवर लाकडी दरवाजा लावला होता ते पुरावशेष कोसळले असून याला सर्वस्वी जबाबदार हे आंधळेपणाने परवानगी देणारे पुरातत्व खाते असल्याचे म्हटले आहे. याबाबत पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.