
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रविवारी (ता. २२) पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे भवानी पेठ, नाना पेठेसह सोलापूर मार्ग रविवारी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. रविवारी पहाटेपासून वाहतुकीत बदल केला जाणार आहे, त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.