Palkhi 2025 : पालखी पुणे मुक्कामी; २४ तास दर्शनाचा लाभ आणि पुणेकरांची सेवा
Warkari In Pune : पुण्यात पालखी मुक्कामादरम्यान हजारो वारकऱ्यांनी २४ तास उघड्या असलेल्या पादुका दर्शनाचा लाभ घेतला आणि पुणेकरांच्या अन्नछत्र व सेवा उपक्रमांचा अनुभव घेतला.
पुणे : संत ज्ञानेश्वर व संत तुकोबांच्या पालख्या मुक्कामासाठी नाना पेठ व भवानी पेठेतील मंदिरात विसावल्यानंतर वारकऱ्यांनी दर्शनासाठी रीघ लावली. त्यानंतर वारकऱ्यांनी पुणे दर्शनाचा आनंद लुटला.