पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, दारुची दुकाने बंद ठेवणार

यंदाच्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले असून संबंधित कामे अंतिम टप्प्यात आहेत.
Palkhi route
Palkhi routesakal
Updated on
Summary

यंदाच्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले असून संबंधित कामे अंतिम टप्प्यात आहेत.

पुणे - यंदाच्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले असून संबंधित कामे अंतिम टप्प्यात आहेत. पालखी तळासह इतर सुविधांची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत. या सोहळ्यादरम्यान पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट आणि दारुची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

उरळी देवाची येथील साईड पट्टयांची कामे, वडकीनाला येथील पालखी विसावा, जेजुरी पालखी तळ, लोणी काळभोर, बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील सेवा रस्त्याची दुरुस्ती, दौंड ते नीरा रस्त्याच्या साईड पट्टयांची दुरुस्ती ही कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कऱ्हा नदीवरील पुलाची दुरुस्ती, इंदापूर तालुक्यातील आंथुर्णे आणि सणसर येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सपाटीकरण व रस्ता करण्यात येत आहे. सासवड नगरपालिकेतर्फे पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणाशी संबंधित कामे सुरू आहेत.

परिवहन विभागातर्फे पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षाविषयक तपासणी करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, मच्छी् मार्केट, दारुची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्याचे नियोजन आहे.

पालखी मार्गावर प्रस्थानाच्या वेळी ठराविक मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील रुग्णालयातील १० टक्के खाटा पालखी सोहळ्यादरम्यान आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. पालखी व्यवस्थापनाबाबत माहितीसाठी पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले आहे.

पालखी मार्गावर सुविधा...

  • जिल्हा परिषद आणि दोन्ही महापालिकांतर्फे स्त्रीरोग तज्ञांची सुविधा

  • महिलांसाठी पाच किलोमीटर अंतरावर स्वच्छतागृह

  • पाणी पुरवठ्यासाठी विशेष नियोजन, ७० टँकरची व्यवस्था

  • आषाढी वारीसाठी ३७ विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहीत

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक विशेष दक्षता

  • ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

  • २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ८७ फिरते वैद्यकीय पथक आणि १०८ रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com