
पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन झाल्याने शहरातील बाजारपेठा वारकऱ्यांच्या खरेदीने गजबजून गेल्या होत्या. पावसाळ्याचे आगमन आणि रस्त्यावरचा प्रवास लक्षात घेता वारीतील मुक्कामासाठी आणि प्रवासासाठी लागणाऱ्या तंबू, ताडपत्री, छत्र्या, प्लॅस्टिक कागद यांसारख्या वस्तूंची खरेदी वारकऱ्यांनी केली.