संत तुकाराम महाराज पालखी श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये मुक्कामी रहाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Palkhi will stay at Shri Narayandas Ramdas High School

संत तुकाराम महाराज पालखी श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये मुक्कामी रहाणार

इंदापूर - कोरोना महामारीमुळे दोन वर्ष संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाताना इंदापूरला मुक्कामी न आल्याने शहर अध्यात्मिक पर्वणी असणाऱ्या पालखी सोहळ्यास मुकल्याने सोहळा परंपरेप्रमाणे इंदापुरातील श्री नारायणदास रामदास हायस्कूल प्रांगणात मुक्कामी असावा, अशी नगरसेवक भरत शहा व सहकाऱ्यांची मागणी पालखी सोहळा प्रमुखनितीन महाराज मोरे यांनी मान्य केल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला.

यंदा पालखी सोहळा मुक्कामाचे नियोजन आय. टी. आय मधील नूतन पालखी तळावर करण्याचे नियोजन होते. मात्र त्याविरुद्ध इंदापूरकरांनी एकत्र येत सिद्धेश्वर, इंद्रेश्वर मंदिरात बैठक घेत आवाज उठवला होता. यासंदर्भात प्रशासनाने पालखी सोहळा विश्वस्तांकडे बोट केल्याने तसेच पालखी सोहळा प्रमुखांना लेखी पत्र देवून सुध्दा त्याची दखल न घेतली गेल्याने इंदापूरकरांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन केले. त्यानंतर यवत मुक्कामी सर्वांनी पालखी विश्वस्तांची भेट घेवून त्यांनाविनंती केली. मात्र त्यांनी बारामती येथे निर्णय घेवू असे उत्तर दिले होते.

त्या पार्श्वभूमीवर आज दि. २८ जून रोजी भरत शहा व सहकाऱ्यांनी सिध्देश्वर मंदिरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भरत शहा, बीएमपी चे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,समन्वयक बापू जामदार यांनी पालखी सोहळा विश्वस्तांनी इंदापूरकरांच्या भावनेचा आदर करावा, असे आवाहन केले.

यावेळी भरत शहा म्हणाले, शासनाने पालखी सोहळ्यास गावाबाहेर जागा मुक्कामासाठी दिली आहे.मात्र यंदा सोहळा परंपरेप्रमाणे मुक्कामी उतरवावा,पुढील वर्षी पालखी संस्थान जो निर्णय घेईल, तो आम्हा सर्वांना मान्य आहे.आमच्या आंदोलनामुळे पालखी संस्थानच्या भावनादुखावल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.

यानंतर पत्रकारांनी नितीन महाराज मोरे यांना फोन वरून संपर्क साधला असता त्यांनी यंदा सोहळ्याचा मुक्काम पूर्वीप्रमाणे शाळेत करू मात्र पुढील वर्षापासून शासनाने दिलेल्या जागेत मुक्काम करणार असल्याचे त्यांनी सूचित केले. यावेळी महादेव सोमवंशी, सुरेश गवळी, राजेश शिंदे, हमीद आतार, ललेंद्रा शिंदे, जावेद शेख, ओंकार जौंजाळ, प्रकाश पवार, व्यंकटेश वाशिंबेकर, संजय खंडाळे, धीरज शहा, हनुमंत कांबळे, वसीम शेख उपस्थित होते.

Web Title: Palkhi Will Stay At Shri Narayandas Ramdas High School

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top