
पुणे : पंढरीच्या विठुरायाच्या चरणी आषाढी वारी रुजू करून परतणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी (ता. १८) पुण्यनगरीत विसावल्या. दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकर भाविकांनी गर्दी केली होती. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करत संत माउलींची पालखी सकाळी साडेपाच वाजता; तर संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी साडेचार वाजता पुण्यात मुक्कामी विसावल्या. माउलींच्या पालखी रविवारी सकाळी आळंदीकडे; तर तुकोबारायांची पालखी शनिवारी सकाळी पिंपरीकडे मार्गस्थ होणार आहे.