Maharashtra Rural Developmentesakal
पुणे
Panchayati Raj : लोकसहभागातून समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करा : जयकुमार गोरे
Rural Development : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावागावात लोकसहभागातून ग्रामीण विकास साधण्याचा प्रयत्न सुरु असून, सरपंच व नागरिकांनी याला चळवळ बनवावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
पुणे : ‘‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामविकासाला बळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. समृद्ध गाव बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्री यांचा असून त्यासाठी हे अभियान गावपातळीवर, नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी एक चळवळ तयार झाली पाहिजे. लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करा,’’ असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी केले.