पांचगणी : पाचगणी शहरवासीयांसाठी खुशखबर: मालमत्ता करावरील शास्तीत ५० टक्के सवलत; ''अभय योजने''चा लाभ घेण्याचे मुख्याधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचे आवाहन

पांचगणी : पाचगणी शहरवासीयांसाठी खुशखबर: मालमत्ता करावरील शास्तीत ५० टक्के सवलत; ''अभय योजने''चा लाभ घेण्याचे मुख्याधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचे आवाहन

Published on

पाचगणीतील मिळकतधारकांना दिलासा

अभय योजना लागू; थकीत दंडाच्या रकमेत ५० टक्के सवलत

पाचगणी, ता. ३ : येथील पालिका क्षेत्रातील मिळकतधारकांना दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार पालिकेने थकीत मालमत्ताकरावरील शास्ती (दंड) माफीसाठी प्रोत्साहनात्मक अभय योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना त्यांच्या थकीत दंडाच्या रकमेत तब्बल ५० टक्के सवलत मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या योजनेचा जास्तीतजास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप बगाडे, उपाध्यक्ष प्रकाश गोळे आणि मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी केले आहे.
ही योजना १९ मे २०२५ पर्यंतच्या थकीत मालमत्ता करावर लागू असून, ज्या मिळकतधारकांची शास्तीची रक्कम थकलेली आहे. त्यांना याचा लाभ घेता येईल. या योजनेच्या अटीनुसार जे मिळकतधारक ५० टक्के शास्ती वगळता उर्वरित सर्व थकीत मालमत्ता कराची रक्कम आणि ५० टक्के दंडाची रक्कम पूर्णपणे भरतील, केवळ त्यांच्याच अर्जांचा विचार या सवलतीसाठी केला जाणार आहे. नागरिकांनी नगरपालिकेच्या कर विभागातून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून ते दहा मार्चपर्यंत कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. हे प्राप्त झालेले सर्व अर्ज एकत्रितपणे मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले जातील आणि त्यांच्या मान्यतेनंतरच ही सवलत प्रत्यक्ष लागू केली जाईल.
शहराच्या विकासात आपले योगदान देण्यासाठी आणि दंडाचा वाढता बोजा कमी करण्यासाठी ही योजना एक उत्तम संधी असल्याचे नगराध्यक्ष बगाडे यांनी नमूद केले आहे. उपनगराध्यक्ष गोळे यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता त्वरित कराचा भरणा करून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सर्व मिळकतधारकांनी अभय योजनेचा लाभ घेऊन आपल्या शहराच्या प्रगतीत सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

कोट -
नागरिकांनी मुदतीत कराचा भरणा करून संभाव्य कायदेशीर कारवाई टाळावी. नगरपालिकेच्या प्रशासन व्यवस्थेला सहकार्य करावे.
- पंडित पाटील, मुख्याधिकारी

26B07358
पाचगणी फोटो आहे

Marathi News Esakal
www.esakal.com