

कचरामुक्तीसाठी पाचगणीकरांचे नवे व्यवस्थापन
पालिकेसह हिलदारीतर्फे झिरो वेस्ट कॅम्पस उपक्रम; नव्या नियमांबाबतही कार्यशाळा
पाचगणी, ता. १० : पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पाचगणी शहराला कचरामुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी पाचगणी पालिकेने कंबर कसली आहे. पालिका प्रशासन आणि ‘हिलदारी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘झिरो वेस्ट कॅम्पस’, तसेच आगामी ‘नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
पालिका सभागृहात झालेल्या कार्यशाळेचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप बागडे, आघाडी प्रमुख शेखर कासुर्डे आणि आरोग्य सभापती राजश्री सणस यांच्या हस्ते, तसेच नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाले.
या उपक्रमासाठी मुख्याधिकारी पंडित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकामी मोलाचे सहकार्य केले. प्रास्ताविकात श्री. कासुर्डे यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व विशद केले. पाचगणीसारख्या पर्यटनस्थळाचे नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी केवळ प्रशासनच नव्हे, तर नागरिक, शाळा आणि हॉटेल व्यावसायिकांनी आपली सामूहिक जबाबदारी ओळखून सक्रिय सहभाग नोंदवणे काळाची गरज असल्याचे नमूद केले. जे कॅम्पस उपक्रम आदर्शवत राबवतील, त्यांचा आगामी पर्यावरण दिनानिमित्त विशेष गौरव केला जाणार असल्याचे डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी जाहीर केले.
या वेळी उपाध्यक्ष प्रकाश गोळे, नगरसेवक आकाश बगाडे, राजश्री सणस, माधुरी कासुर्डे, परवीन मेमन, शिल्पा माने, स्वाती कांबळे, विमल भिलारे, सुप्रिया माने, गणेश कासुर्डे, अनिता चोपडे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेला पाचगणीतील विविध नामवंत शाळा आणि हॉटेलचे ५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
...............................
कार्यशाळेत महत्त्वाचे
पहिल्या सत्रात आशिष वैष्णव यांचे मार्गदर्शन
कोरडा कचरा, पालापाचोळ्यापासून ''पेललेटिंग'' तंत्रज्ञानाचा वापर
त्यातून ऊर्जा व उपयुक्त उत्पादने करण्याविषयी माहिती
दुसऱ्या सत्रात ‘नारी केअर’चे कॅप्टन राहुल यांचे मार्गदर्शन
सॅनिटरी पॅडमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर पर्यावरणीय समस्यांवर बाेट
‘हिलदारी’चे डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी ‘झिरो वेस्ट कॅम्पस’ यांच्याकडून संकल्पनेवर प्रकाश
१ एप्रिल २०२६ पासून लागू होणार व्यवस्थापनाच्या नव्या तरतुदी
....................................................
फोटो :.............. BHL26B07395
पाचगणी : मार्गदर्शन करताना डॉ. मुकेश कुलकर्णी. समवेत दिलीप बगाडे, शेखर कासुर्डे व इतर. (रविकांत बेलोशे : सकाळ छायाचित्रसेवा)
........................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.