शुभम ताठे देशमूख आयोजित महाआरोग्य शिबिर संपन्न... सुमारे ५०० नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ

शुभम ताठे देशमूख आयोजित महाआरोग्य शिबिर संपन्न... सुमारे ५०० नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ

Published on

PDR26B09426
पंढरपूर : महाआरोग्य शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर.
---
५०० नागरिकांनी घेतला
महाआरोग्य शिबिराचा लाभ
शिवजयंतीनिमित्त ताठे देशमुखांतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २६ : शिवजयंती सप्ताहाच्या निमित्ताने येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक अध्यक्ष शुभम ताठे देशमुख यांच्या वतीने नुकतेच महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ सुमारे ५०० नागरिकांनी घेतला.
गांधी रोड येथील सणगर समाज मठामध्ये आयोजित या शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी युटोपियन शुगरचे उमेश परिचारक, पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिती भालके, धाराशिव शुगरचे अमर पाटील, नाना कवठेकर, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, ताठे अगरबत्तीचे सागर ताठे देशमुख, नगरसेवक ओंकार जोशी, ऋषीकेश भालेराव आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रणिती भालके म्हणाल्या, आरोग्यम् धनसंपदा याप्रमाणे आपल्याबरोबरच आपल्या शहरातील नागरिकांसाठी शुभम ताठे देशमुख यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन करून अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
या शिबिरात त्वचारोग, स्त्रीरोग, दंतरोग आदी तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरासाठी डॉ. सूरज गायकवाड, डॉ. आश्लेषा गायकवाड, डॉ. रेश्मा करंडे, डॉ. सौरभ ठवरे, डॉ. ऊर्मिला ठवरे, डॉ. महेश सपाटे, डॉ. भाग्यश्री लवटे, डॉ. अभिलाष धायतडक यांचे सहकार्य लाभले. या शिबिरासाठी माधव ताठे देशमुख, अविनाश डोईफोडे, अंकुश गाजरे, संभाजी पाटील, विशाल डोंगरे, यश पाठक, समर्थ पवार, शंतनू सुतार, ओंकार मोहोळकर, अजिंक्य वनारे, सागर शिंदे, राहुल लवटे, गौरव खंडाळे आणि शुभम ताठे देशमुख मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com