

30-year-old woman murdered inside home in Pandare
Sakal
माळेगाव : पणदरे (ता. बारामती) येथील खडकआळी परिसरात घरातील झोपण्याच्या खोलीत विवाहित महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. १२) रात्री उघडकीस आली.वैशाली तानाजी पवार (वय ३०, रा. पणदरे) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.