पांडे गट वार्तापत्र

पांडे गट वार्तापत्र

Published on

पांडे जि.प. गट

POT26B02151ः रश्मी बागल
POT26B02149 ः राणी वारे
POT26B02150 ः ज्योती सावंत

पांडे गटात तिरंगी सामन्याने आणली रंगत
प्रचारासाठी मोठे नेते गटात सक्रिय; बागल यांची प्रतिष्ठा पणाला

नाना पठाडे ः सकाळ वृत्तसेवा
पोथरे, ता. ४ : पांडे जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत असून, तिन्ही गटाकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष रश्मी बागल रिंगणात असून‌ करमाळा तालुका विकास आघाडी कडून ज्योती सावंत व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राणी वारे अशी तिरंगी लढत होत असल्याने प्रचारात रंगत आली आहे. कोण कोणाची मते खाणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात अन्य ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्या तरी करमाळा तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती झालेली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरोधात निवडणूक लढवत आहे. शिवाय आमदार पाटील यांनी करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यामातून भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादींना आव्हान दिले आहे.
या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ गावातील नेते व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. पांडे गट बागल यांचा पारंपारिक गड मानला जातो. माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे कार्यकर्ते जोरदार प्रचारात उतरले आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी ही भाजप-राष्ट्रवादीला पाठिंबा देत निलज, बाळेवाडी पोटेगाव आदी गावात बागल यांच्या विजयासाठी बैठका घेतल्या आहेत. तालुका विकास आघाडीच्या ज्योती सावंत यांच्या प्रचारार्थ सावंत समर्थकांसह आमदार नारायण पाटील सभा घेऊन गाव भेटी करत आहेत. राणी वारे यांच्या विजयासाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील सभा घेत आहेत. एकंदरीतच तिन्ही उमेदवाराकडून विजयाचे दावे केले जात आहे.
पांडे गणात पाचरंगी लढत असून, भाजपचे अप्पा भोसले, तालुका विकास आघाडीचे स्वप्नील काळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिवाजी जाधव शिवसेनेचे प्रदीप बनसोडे तर अपक्ष युवराज भोसले रिंगणात आहेत. या गणात भाजप, तालुका विकास आघाडी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात लढत असून कोण कोणाची मते खाणार यावर विजय अवलंबून आहे.
रावगाव गणात तिरंगी लढत असून‌ भाजपकडून संध्या कांबळे, तालुका विकास आघाडीकडून साळुबाई लांडगे तर राष्ट्रवादी (शप) कडून दीपाली कांबळे रिंगणात आहेत. पूर्णवेळ प्रचार यंत्रणा राबवत आहे.

जिल्ह्यातील चर्चेतील लढत
जिल्ह्यातील काही चर्चेतील लढतींमध्ये पांडे गट आहे. हा गट बागल गटाचा गड मानला जातो. यावेळी तिरंगी सामना होत असल्याने आणि नारायण पाटील यांच्या आघाडीचा तोटा आणि फायदा कोणाला होणार यामुळे गटातील लढतीत रंगत वाढली आहे. शिवाय जगताप गटाने बागल यांना पाठिंबा दिल्याने लढत रंगतदार होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com