जिल्हा परिषद प्राथमीक शाळेतली दाखल  पहिली च्या  विद्यार्थी  बैल गाडी तुन चिमुकल्या ची मिरवणुक

जिल्हा परिषद प्राथमीक शाळेतली दाखल पहिली च्या विद्यार्थी बैल गाडी तुन चिमुकल्या ची मिरवणुक

Published on

PDE26B05009
पांडे ः येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सजवलेल्या बैलगाडीतून पहिलीच्या विद्यार्थ्यांची काढलेली मिरवणूक.

‘पट वाढवा’ उपक्रमात पांडेत बालचमूची प्रभातफेरी

पांडे, ता. २१ : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ‘पट वाढवा’ उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. यानिमित्ताने गावातून सजवलेल्या बैलगाडीतून बालचमूंची सवाद्य प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीत माता-पालक व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास भोसले, उपाध्यक्ष संपतराव जाधव तसेच मार्गदर्शक ज्ञानदेव क्षिरसागर व प्रदीप क्षिरसागर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या माताही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच औक्षण करून त्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध खेळांचे साहित्य, फुगे व पुष्पे देण्यात आली. शाळेचे विमल थोरात व बाळासाहेब वाघमोडे यांनी शाळेविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्योती राऊत, सविता झुंजकर, राणी घोलप व लंका साळुंके यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना स्वादिष्ट गोड बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com