माझा प्रभाग माझे विजन: प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, वृक्षारोपण प्राधान्याने करणार: नगरसेवक धर्मराज घोडके
PDR26B09456
मूलभूत सुविधा देण्यासाठी प्राधान्य
पंढरपूर ः माझा प्रभाग क्रमांक १५ अ मधील नागरिकांना स्वच्छ व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा, धूळमुक्त रस्ते, बंदिस्त भुयारी गटारी आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय यमाई तलाव ट्रॅक ते टाकळी रोड या अहोरात्र वर्दळीच्या रस्त्यावर पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. पुंडलिक नगर मधील गणेश मंदिराचे वॉल कंपाऊंड तसेच पेविंग ब्लॉक बसवण्याचे नियोजन केले आहे. यमाई नगर, ओंकार नगर, वृंदावन नगर लक्ष्मी नगर, सिद्धिविनायक सोसायटी, हाके प्लॉट मधील सर्व अंतर्गत रस्त्यांचे प्राधान्याने डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी आपल्या समस्या व्हाट्सअप वर पाठवल्यानंतर त्या समस्या तातडीने सोडवण्यावर भर देत आहे. माझ्या प्रभागातील सर्व रस्ते व ओपन स्पेस मध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून सर्व परिसर सुशोभीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- धर्मराज घोडके नगरसेवक, पंढरपूर नगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

