सकाळ वृत्तसेवा पंढरपूर दि.7 मार्च   फोटो घेणे अथंसंकल्पात पंढरपूर तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी- मा.आ.प्रशांत परिचारक

सकाळ वृत्तसेवा पंढरपूर दि.7 मार्च फोटो घेणे अथंसंकल्पात पंढरपूर तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी- मा.आ.प्रशांत परिचारक

Published on

PDR26B09472
प्रशांत परिचारक
---
पंढरपूरसाठी अर्थसंकल्पात कोट्यवधींची तरतूद
रिंगरोडसाठी २७८ कोटी, उड्डाणपुलासाठी ५० कोटी; भीमा नदीवर दोन नवीन पूल उभारणार
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ७ : राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात पंढरपूर तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शहर आणि ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते व पुलांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता, अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रिंगरोड व उड्डाणपुलांसाठी मोठा निधी जाहीर करण्यात आला आहे. पंढरपूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या वाखरी- टाकळी- अनवली- मुंढेवाडी- अजनसोंड- देगाव या रिंगरोडसाठी तब्बल २७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शहराबाहेरून अवजड वाहतूक वळविण्यास मदत होणार असून, भाविक आणि स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
तसेच शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठाकरे चौक ते टाकळी रस्त्याच्या रुंदीकरणासह उड्डाणपुलासाठी ५० कोटी १६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
भीमा नदीवरील दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी दोन महत्त्वाचे पूल उभारले जाणार आहेत. मुंढेवाडी- अजनसोंड मार्गावरील भीमा नदीवर नवीन पुलासाठी ३२ कोटी ५० लाख रुपये तर शहरातील जुन्या दगडी पुलाशेजारी समांतर पूल उभारण्यासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे वारी कालावधीत तसेच दैनंदिन वाहतुकीतील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
यासोबतच ग्रामीण भागातील रस्त्यांसाठीही मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे. या विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तालुक्याच्या वतीने आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com