आपत्कालीन सेवांसाठी रस्ते केले मोकळे; अनधिकृत अतिक्रमण केल्यास कठोर कारवाईचा इशारा

आपत्कालीन सेवांसाठी रस्ते केले मोकळे; अनधिकृत अतिक्रमण केल्यास कठोर कारवाईचा इशारा
Published on: 

PDR26B10145
पंढरपूर : रस्त्यालगतच्या स्टॉल धारकाचे अतिक्रमण हटवताना पालिकेचे व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी.

कार्तिकीपूर्वी तीन दिवस अतिक्रमणांवर हातोडा!
प्रमुख रस्ते, मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविली; पुन्हा अतिक्रमण केल्यास कारवाईचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. १८ : पंढरपूर शहरातील प्रमुख रस्ते, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंटातील अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरपरिषद, जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सलग तीन दिवस ही धडक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्टेशन रोड, चौफाळा ते महाद्वार घाट, अहिल्यादेवी चौक ते गजानन महाराज मंदिर आणि चंद्रभागा वाळवंट परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. यात अनधिकृत टपऱ्या आणि उसाच्या दुकानांचाही समावेश होता. दुसऱ्या दिवशी स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौफाळा रोड आणि गांधी रोड ते प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमणे हटविली. चौफाळा ते मंदिर परिसरातील दुकानदारांना विक्रीचे साहित्य पांढऱ्या पट्टीच्या आत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तिसऱ्या दिवशी चौफाळा ते मंदिर परिसरातील पांढऱ्या पट्टीबाहेरील अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच प्रदक्षिणा मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अर्बन बँक आणि गजानन महाराज मठ ते भक्ती मार्गावरील अतिक्रमणे काढण्यात आली. कारवाईदरम्यान तीनही दिवस पोलिस बंदोबस्त तैनात होता. या मोहिमेत जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, नगरपरिषदेचे अधिकारी व २० कर्मचारी, तसेच पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.