पंढरपूर तालुक्यातील पाच हजार एकरावरील निर्यात द्राक्षाची खरेदी थांबली;  शेतकर्यांना शेकडो कोटी रुपयांचा आर्थिक फटका

पंढरपूर तालुक्यातील पाच हजार एकरावरील निर्यात द्राक्षाची खरेदी थांबली; शेतकर्यांना शेकडो कोटी रुपयांचा आर्थिक फटका

Published on

द्राक्षाचा फोटो वापरणे
.........
पाच हजार एकरावरील निर्यात द्राक्षाची खरेदी थांबली
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट; खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने कोंडी

भारत नागणे : सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ६ : इस्राईल-इराक युद्धाचा थेट फटका पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. आखाती देशात द्राक्षाची होणारी निर्यात पूर्णपणे थांबल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. तालुक्यातील सुमारे पाच हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष निर्यातीसाठी तयार झाली आहेत. पण खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.
तसेच टाकळी येथील शेतकरी सुरेश टिकरे यांच्या १२ एकरावरील सुमारे दोन कोटी रुपयांची २०० टन द्राक्ष खरेदी विना बागेत आहेत. व्यापाऱ्यांनी पाठ फिरल्याने द्राक्ष उत्पादक चिंता आणखी वाढली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष आणि बेदाण्याचे उत्पादन पंढरपूर तालुक्यात होते. तालुक्यात सुमारे १० हजार एकर क्षेत्रावर द्राक्षाचे पीक आहे. यावर्षी तालुक्यातील कासेगाव, टाकळी, खर्डी, करकंब, पुळूज या भागातील शेतकऱ्यांनी सुमारे ५ हजार एकर क्षेत्रावर निर्यात क्षम द्राक्षाचे उत्पादन घेतले आहे. उन्हाळा आणि रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर दुबई, इराण, इराक, कुवेत, सौदेअरेबिया यासह आखाती देशामध्ये मोठ्या प्रमाणावर येथील द्राक्षाची निर्यात होते. सुरवातीला काही शेतकऱ्यांची प्रती किलो १०० रुपये दराने द्राक्षाची निर्यात झाली. त्यानंतर मात्र इस्राईल इराण अमेरिकेसह मध्यपूर्व जगात युद्धाचा भडका उडाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरु आहे. या युद्धाचा फटका पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष, केळीसह इतर फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये सुमारे ५०० कोंटीचा आर्थिक फटका फक्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. स्थानिक बाजारात द्राक्षाचे भाव ४० ते ५० रुपयांवर खाली आले आहेत.

चौकट
दोनशे टन द्राक्षाचा व्यवहार थांबला
टाकळी येथील सुरेश टिकारे यांची १५ एकर द्राक्ष बाग आहे. यापैकी त्यांनी १२ एकरावर निर्यात क्षम द्राक्षाचे उत्पादन घेतले आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुंबईच्या एका निर्यात कंपनीबरोबर प्रति किलो १०० रुपये दराने खरेदी व्यवहार झाला होता. दोन ते दिवसांमध्ये त्यांची २०० टन द्राक्षे दुबईला निर्यात केली जाणार होती. परंतु अचानक युद्ध सुरु झाले. त्यानंतर आखाती देशामध्ये होणारी निर्यात पूर्णतः बंद झाल्याने कंपनीने खरेदीचा व्यवहार थांबवला आहे. श्री. टिकोरे यांना २०० टन द्राक्षातून २ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु निर्यात बंद झालेल्याने ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com