बुलेट मोटरसायकल  सायलेन्सरच्या आवाजात बदल करणाऱ्यांवर होणार कारवाई: सहा.पोलीस  अधिक्षक  प्रशांत डगळे

बुलेट मोटरसायकल सायलेन्सरच्या आवाजात बदल करणाऱ्यांवर होणार कारवाई: सहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे

Published on

PDR26B09446
संग्रहित छायाचित्र
.....
सायलेन्सर आवाजात बदल करणाऱ्यांवर कारवाई
कर्कश आवाजाचे सायलेन्सर न वापरण्याचे पंढरपुरात आवाहन
..........
पंढरपूर, ता. ४ : शहरात बुलेट दुचाकीधारकांकडून कंपनीने नियमानुसार दिलेले सायलेन्सर काढून त्याऐवजी मोठ्या कर्कश आवाजाचे नियमबाह्य सायलेन्सर बसविण्याचे प्रकार वाढले असून, त्यामुळे ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्या दुचाकी, विशेषतः बुलेट वाहनांवर कंपनीने नियमाप्रमाणे दिलेले सायलेन्सरच वापरावेत. मोठ्या कर्कश आवाजाचे, नियमबाह्य सायलेन्सर मोडिफाय करून बसवू नयेत असे आवाहन सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केले आहे.
बुलेट सायलन्सरमधील फेरफारामुळे ध्वनीप्रदूषणात वाढ होत असून नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागतो. या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

पंढरपूर पोलिसांची विशेष मोहीम
नागरिकांनी वाहनांमध्ये अनधिकृत बदल न करता वाहतूक नियमांचे पालन करावे. शहरात बुलेट दुचाकीच्या सायलन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्यांवर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून. नागरिकांनी दुचाकी वाहनांवर कंपनीने नियमाप्रमाणे दिलेले सायलेन्सरच वापरावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ध्वनी प्रदूषण नियम व पर्यावरण संरक्षण अधिनियम या अतंर्गत संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे आवाहनही सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com