चंद्रभागेच्या वाळवंटात आले भक्तीला उधान ... !

चंद्रभागेच्या वाळवंटात आले भक्तीला उधान ... !

Published on

ROP26B02580
पंढरपूर : येथे माघी वारीला आलेल्या भाविकांनी चंद्रभागेच्या वाळवंटात अशी गर्दी केली होती. (छायाचित्रे : मोहन काळे, रोपळे बुद्रूक)

ROP26B02582
पंढरपूर : येथे माघी वारीला आलेल्या भाविकांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.

ROP26B02583
पंढरपूर : चंद्रभागेच्या वाळवंटात हरिभजनात दंग झालेल्या भाविकांचे टिपलेले छायाचित्र.

अवघीं च तीर्थे घडलीं एकवेळा । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥
चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तीला उधाण; हरिनामाचा जयघोष अन्‌ पारंपरिक खेळात भाविक दंग

सकाळ वृत्तसेवा
रोपळे बुद्रूक , ता . २९ :
अवघीं च तीर्थे घडलीं एकवेळा । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥१॥
अवघीं च पापें गेलीं दिगंतरीं । वैकुंठ पंढरी देखिलिया ॥ध्रु.॥
अवघिया संतां एकवेळा भेटी । पुंडलीक दृष्टी देखिलिया ॥२॥
तुका म्हणे जन्मा आल्याचें सार्थक । विठ्ठलचि एक देखिलिया ॥३॥
या अभंगाच्या ओळी आज प्रत्यक्षात उतरल्याचा अनुभव पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटात पाहायला मिळाला. चंद्रभागेच्या वाळवंटात आज जणू भाविकांच्या भक्तीला उधाण आले होते.
पहाटेपासूनच टाळ–मृदंगाचा निनाद... भगव्या ध्वजांच्या रांगांतून चालणाऱ्या दिंड्या... भजन–कीर्तनात तल्लीन झालेले वारकरी... तर काही ठिकाणी हातात हात घालून फुगडी खेळणारे स्त्री-पुरुष या दृश्यांनी चंद्रभागेचे वाळवंट जणू भाविकांच्या भक्तीला उधाण आले होते. पांढऱ्याशुभ्र वेशातील वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा नव्हे, तर समाधान आणि भक्तीचा तेजस्वी आनंद दिसत होता. चंद्रभागेच्या पात्रात स्नान करून विठ्ठलनामाचा जप करणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी झाली होती. देहाच्या कष्टांपेक्षा मनाच्या समाधानाला अधिक महत्त्व देणारी वारकरी परंपरा या वारीत पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली. जाती-पाती, गरीब-श्रीमंत, लहान - थोर असे सर्व भेद विसरून ‘माउली’च्या नावाखाली एकत्र आलेली ही माणसे समाजाला एकात्मतेचा संदेश देत होती. प्रशासन, स्वयंसेवक आणि वारकरी सेवकांनी भाविकांसाठी पाणी, आरोग्य व सुरक्षेची योग्य व्यवस्था केली होती. म्हणून या वारीत शिस्त होती.
वारी म्हणजे केवळ पंढरीची वाट नाही, तर ती मनाच्या विकारांना सोडून देण्याची, अहंकार विसरण्याची आणि माणूस म्हणून पुन्हा स्वतःकडे पाहण्याची संधी आहे. माघ वारीनिमित्त पंढरपुरात अनुभवलेली ही भक्ती केवळ पाहण्यासारखी नव्हती, तर जगण्यासारखी होती.

कोट...
पंढरीची वारी म्हणजे आमचा श्वास आहे. चंद्रभागेचे दर्शन झाले की सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन झाल्याचे समाधान लाभते.
सुभाष शिंदे, भाविक, भोसे, ता. मिरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com