पंढरपूर-मल्हारपेठ महामार्गाच्या कामामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान; महामार्गाच्या कामानंतर लावली नाहीत झाडे

पंढरपूर-मल्हारपेठ महामार्गाच्या कामामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान; महामार्गाच्या कामानंतर लावली नाहीत झाडे

Published on

MHD25B04908
महूद : पंढरपूर-मल्हारपेठ मार्गाचे रुंदीकरण होण्यापूर्वीची वनराई व रुंदीकरण झाल्यानंतरचा रस्ता.

पंढरपूर-मल्हारपेठ महामार्गावर दोन वर्षांनंतरही वृक्षारोपण नाही
पर्यावरणप्रमींकडून कारवाईची मागणी; पायी पंढरीला येणाऱ्यांचे होताहेत हाल

सकाळ वृत्तसेवा
महूद, ता. ३० : मल्हारपेठ ते पंढरपूर या राज्यमार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या कडेला असणारी शेकडो देशी झाडे तोडण्यात आली. दोन वर्षानंतर अद्याप या मार्गाच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आलेले नाही. संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का असा सवाल पर्यावरणप्रमींकडून विचारला जात आहे. या रस्त्यावर झाडे नसल्याने वारकऱ्यांचे हाल होणार आहेत. शिवाय या बाबत झाडे लावण्याचा कायदा असताना वृक्षारोपण केलेले नसल्याने कायद्याची अंमलबजावणीही झालेली नाही.

याबाबात शिवउद्योग संघटनेचे माढा लोकसभा मतदारसंघ प्रमुख जितेंद्र बाजारे यांनी पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. पंढरपूर ते मल्हारपेठ मार्गाचे काम पूर्ण होऊन दोन वर्षे झाली आहेत. या मार्गाचे रुंदीकरण करताना त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या जुन्या महाकाय देशी वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने हरित मार्ग वृक्षारोपण व देखभाल धोरण २०१५ नुसार जुन्या तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात पाच ते दहा झाडे लावणे आवश्यक होते, तसा कायदाही आहे. तरीसुद्धा अद्याप वृक्ष लागवड करण्यात आली नाही. ही वृक्ष लागवड का झाली नाही? याची चौकशी करून संबंधित ठेकेदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे. शिवाय या महामार्गाची देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करून त्याचे वरही आर्थिक दंडात्मक व शिक्षेची कारवाई करण्यात यावी.
या महामार्गाच्या दोन्ही बाजूला ताबडतोब वृक्ष लागवड करण्यात यावी. यापूर्वी वृक्ष लागवड झाली असल्यास व त्याचे संगोपन झाले असल्यास ते नागरिकांच्या निदर्शनास आणून द्यावे व पर्यावरणाचा समतोल राखावा. या महामार्गाने आषाढी तसेच इतर वारीसाठी लाखो वारकरी चालत जातात. या वारकऱ्यांना रस्त्यालगतचे वृक्ष निवारा देत होते. मात्र आता या रस्त्यालगत वृक्ष नसल्याने त्यांनाही विसावा घेता येत नाही. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. याबद्दल कायद्यातील तरतुदीनुसार संबंधितावर कारवाई व्हावी, अन्यथा आंदोलन करण्याचा मार्ग अवलंबला जाईल असेही या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com