देवेंद्र पावले… पंढरपूर–मंगळवेढ्यासाठी अर्थसंकल्पात ५०१ कोटींची तरतूद आमदार समाधान आवताडे यांची माहिती; रिंग रोड, उड्डाणपूल व भीमा नदीवर दोन पूल होणार

देवेंद्र पावले… पंढरपूर–मंगळवेढ्यासाठी अर्थसंकल्पात ५०१ कोटींची तरतूद आमदार समाधान आवताडे यांची माहिती; रिंग रोड, उड्डाणपूल व भीमा नदीवर दोन पूल होणार

Published on

UPR२६B०७५९७
पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी अर्थसंकल्पात ५०१ कोटी
आमदार आवताडे; रिंग रोड, उड्डाणपूल व भीमा नदीवर दोन पूल होणार

सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ६ : राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ५०१ कोटी १६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात ही तरतूद करण्यात आली आहे.
या निधीतून पंढरपूर शहरातील उर्वरित रिंग रोड, ठाकरे चौक ते टाकळी रोड उड्डाणपूल, भीमा नदीवरील दोन नवीन पूल, तसेच मंगळवेढा उपसा सिंचन योजना आणि विविध रस्त्यांच्या रुंदीकरण व सुधारणा कामांचा समावेश आहे. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वाखरी-टाकळी-अनवली-मुंढेवाडी रिंग रोडसाठी २१८ कोटी रुपये, गुंजेगाव-तनाळी-कासेगाव ते पंढरपूर रस्त्यासाठी ३१ कोटी ५० लाख, तर गोपाळपूर-रांझणी-ओझेवाडी मार्गासाठी ३८ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय पंढरपुरातील ठाकरे चौक ते टाकळी रोड उड्डाणपुलासाठी ५० कोटी १६ लाख, मुंढेवाडी-अजनसोंड रस्त्यावर भीमा नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी ३२ कोटी ५० लाख, दगडी पुलाशेजारी दुसरा पूल उभारण्यासाठी ४५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणा व रुंदीकरणासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच संबंधित मंत्र्यांचे सहकार्य लाभल्याचेही आमदार आवताडे यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com