पंढरपूरच्या एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्याचा सूचना

पंढरपूरच्या एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्याचा सूचना

Published on

UPR२६B०७५९४
मुंबई ः पंढरपूर येथील एमआयडीसी संदर्भातील बैठकीसाठी उपस्थित असलेले उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार समाधान आवताडे व अधिकारी.

कासेगाव एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावा
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना; मुंबई येथे बैठक

पंढरपूर, ता. ६ ः कासेगाव (ता. पंढरपूर) येथील एमआयडीसीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मंत्रालयात आज उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. याबैठकीत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत.
आमदार आवताडे यांनी पंढरपूर एमआयडीसीच्या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत त्यांच्याकडे पाठपुरावा केला आहेत. येथील एमआयडीसीचा प्रश्न मागील ४० वर्षांपासून प्रलंबित होता. मागील काही दिवसांपासून या कामाला गती आली आहे.
कासेगाव (ता. पंढरपूर) येथे एमआयडीसी यापूर्वी मंजुरी मिळवली आहे. यामध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये उद्योग मंत्रालयाने ५४ एकर जमीन ''औद्योगिक क्षेत्र'' म्हणून घोषित केली आहे. याबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे. दरम्यान, अर्थसंकल्प अधिवेशनात झालेल्या बैठकीत पंढरपूर एमआयडीसी हा विषय मार्गी लावण्याचे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com