पंढरपूरच्या बाजारात नवा बेदाणा दाखल; पहिल्याच दिवशी 150 टन बेदाण्याची आवक
बेदाण्याचा फोटो वापरणे
पंढरपूरच्या बाजारात नवा बेदाणा दाखल
........
पहिल्याच दिवशी १५० टन बेदाण्याची आवक; प्रतिकिलो ३४५ रुपयांचा भाव
..............
पंढरपूर, ता. ४ : जिल्ह्यातील बेदाणा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून नवा बेदाणा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. पहिल्याच दिवशी पंढरपूरच्या बाजारात विक्रमी १५० टन नव्या बेदाण्याची आवक झाली. येथील बाजारात नव्या बेदाण्याला उच्चांकी ३४५ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला आहे.
सध्या मध्यपूर्व जगात सुरु असलेल्या अमेरिका इस्राईल आणि इराण युद्धाचा सध्यातरी बेदाणा बाजारावर परिणाम झालेला दिसून येत नाही. उलट चीनमधून अफगाणिस्तान मार्गे येणाऱ्या बेदाण्यावर निर्बंध आल्याने देशातील बेदाण्याचे दर वाढल्याचे बेदाणा व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष काढणी हंगाम सुरु झाला आहे. युद्धामुळे निर्यात द्राक्षाला मोठा फटका बसला असला तरी बेदाणा बाजारावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. ३) झालेल्या बेदाणा सौदे बाजारात नव्या बेदाण्याची सुमारे १५० टन विक्रमी आवक झाली. जुन्या बेदाण्या बरोबरच नव्या बेदाण्यालाही चांगला बाजार भाव मिळाला आहे. येथील बाजार सोलापूर, सांगली, सातारा, लातूर, धाराशिव, पुणे यासह कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणावर बेदाणा विक्रीसाठी येत आहे.
स्थानिक बाजारात मागणी वाढली
मंगळवारच्या बाजारात जुना बेदाणा १०० टन तर १५० टन नव्या बेदाण्याची आवक झाली. नव्या बेदाण्याला पहिल्याच दिवशी उच्चांकी ३४५ रुपये भाव मिळाला. तर सरासरी २८५ रुपये दर मिळाला.जुन्या बेदाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे नव्या बेदाण्याला मागणीही वाढली आहे. गुढीपाडवा सण तोंडावर असल्याने बेदाण्याला स्थानिक बाजारात मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने बेदाण्याचे भाव वधारल्याचे बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड यांनी सांगितले.
----
कोट
सोलापूरसह इतर जिल्ह्यात बेदाणा निर्मिती अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे नवा बेदाणा बाजारात दाखल झाला आहे. मंगळवारच्या पहिल्या बाजारात १५० टन नवा बेदाणा दाखल झाला आहे. मागणी वाढल्याने चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला उच्चांकी ३४५ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. सरासरी २८५ ते ३४५ असा दर मिळाला आहे. सध्या युद्ध सुरु असलेले तरी याचा बेदाणा बाजारावर कोणताही परिणाम झाला नाही. परंतु निर्यात द्राक्षाचे दर मात्र पडले आहेत.
-सोमनाथ डोंबे, बेदाणा व्यापारी, पंढरपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

