पंढरपुरातील १० वाळू तस्कर एक वर्षासाठी तडीपार

पंढरपुरातील १० वाळू तस्कर एक वर्षासाठी तडीपार
Published on: 

पंढरपुरातील १० वाळू तस्कर एक वर्षासाठी तडीपार

पोलिस अधीक्षकांची कारवाई; टोळीप्रमुखासह सदस्यांवर दोनपेक्षा जास्त गुन्हे
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २५ : नदीतून बेकायदा वाळू उपसा करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीव पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तडीपारीची कारवाई केली आहे. टोळीप्रमुखासह दहा जणांना पोलिस अधीक्षकांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तडीपार केलेले सगळेजण पंढरपूर तालुक्यातील चळे गावातील आहेत.
सोलापूर जिल्ह्यात वाळूचे लिलाव झालेले नाहीत. तरीदेखील, गैरमार्गाचा अवलंब करून रात्री-अपरात्री भीमा नदीतून वाळू तस्करी करून तो पैसा गुन्हेगारी कृत्यासाठी वापरणाऱ्या टोळीतील सदस्यांवर पूर्वीचे दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. त्या सर्वांवर कलम ५५ नुसार तडीपारीची कारवाई व्हावी, असा प्रस्ताव पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी अधीक्षकांकडे पाठवला होता. त्यानुसार पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वाळू तस्कर टोळीला जिल्ह्यातून हद्दपार केले. आणखी काही वाळू तस्कर पोलिस अधीक्षकांच्या रडावर आहेत. त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती पोलिस अधीक्षकांनी मागवून घेतली आहे. त्यांनी वर्तनात बदल न करता पुन्हा गुन्हेगारी कृत्य सुरू ठेवल्यास त्यांनाही तडीपार केले जाणार आहे. वेळप्रसंगी त्यांच्यावर ‘एमडीए’ची कारवाई होईल, असा इशाराही पोलिस अधीक्षकांनी दिला आहे.
---------------------------------
चौकट
‘हे’ १० वाळू तस्कर तडीपार
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तडीपार केलेल्यांमध्ये टोळीप्रमुख सुनील विलास पाटील, टोळीतील बाबासाहेब दामोदर गाजरे, संभाजी महादेव लोखंडे, राहुल बाजीराव नागणे, सोमनाथ सुरेश गाजरे, बंडोपंत दत्तात्रय गाजरे, बालाजी दत्तात्रय गाजरे, बाळु उर्फ आप्पा गाजरे, समाधान मारूती लोकरे, सचिन हैबत लोकरे (सर्वजण रा. चळे, ता. पंढरपूर) हे सराईत गुन्हेगार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com