पंढरपुरात भुरट्यांची दादागिरी; वृत्तपत्र विक्रेत्यांना दमदाटी

पंढरपुरात भुरट्यांची दादागिरी; वृत्तपत्र विक्रेत्यांना दमदाटी
Published on: 

पंढरपुरात भुरट्यांची दादागिरी;
वृत्तपत्र विक्रेत्यांना दमदाटी

पंढरपूर, ता. २२ : शहरामध्ये भुरट्या दादांच्या भाईगिरीचे प्रकार वाढले आहेत. यातूनच शहरातील छोटे व्यापारी व वृत्तपत्र विक्रेत्यांना दमदाटी करण्याचे वाढले आहेत. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी अशा भुरट्या दादावर कारवाई करावी अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांनी केली आहे.
शहरात मंदिर परिसर, स्टेशन रोड, नाथ चौक आदी भागांमध्ये छोटे व्यापारी रस्त्यावर विविध व्यवसाय करतात. तर चौकाचौकांमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल आहेत. या ठिकाणी येऊन पंढरपूर शहरातील काही भुरटे लोक येऊन छोटे व्यापारी व वृत्तपत्र विक्रेत्यांना दमदाटी करतात. पोलिसांनी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. गुरुवारी (ता. २२) शहरातील दत्त लॉज परिसरात पहाटे ५.३० वाजता दुचाकीवरून आलेल्या अनोळखी दोघांनी वृत्तपत्र विक्रेत्याकडून सहा वृत्तपत्र घेतले व गाडीवर बसून निघून जाऊ लागले. तेव्हा वृत्तपत्र विक्रेत्याने त्यास सहा पेपरचे ३६ रुपये देण्याची मागणी केली, तेव्हा कुठले पैसे? आम्हाला पैसे मागायचे नाही असे म्हणून दोघांनी दमदाटी करण्यास सुरुवात केली. तेव्हा तेथे उपस्थित असलेले आठ ते दहा वृत्तपत्र विक्रेते एकत्र आले व त्यांनी त्यांना पुन्हा समजावून सांगितले दमदाटी करू नका तुमच्याकडे पैसे नसेल तर ऑनलाईन द्या आम्ही ते घेतो अशी मागणी केली. तेव्हा नशा केलेल्या भुरट्या दादाच्या मित्राने मोबाईलवरून ऑनलाइन ३६ रुपये दिले.

दुचाकी शोरूममध्येही गोंधळ
काही दिवसांपासून पंढरपूर शहरांमध्ये भुरट्या दादांनी डोके वर काढले आहे. काही दिवसांपूर्वी इसबावी परिसरातील एका दुचाकी शोरूममध्ये काही भुरट्या दादांनी गोंधळ घालून कर्मचाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर आता वृत्तपत्र विक्रेत्यांनाही दमदाटी केल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com