पंढरपूर विठ्ठल मंदिर विकास आराखड्यासाठी निधीची तरतूद

पंढरपूर विठ्ठल मंदिर विकास आराखड्यासाठी निधीची तरतूद

Published on

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर विकास
आराखड्यासाठी निधीची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ६ : विठ्ठल मंदिर विकास आराखड्यातील पुढील कामांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी राज्य शासनाने विठ्ठल मंदिर जतन आणि संवर्धन कामासाठी ७३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यानंतर उर्वरित विकासकामांसाठी आणखी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. ६) विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये विठ्ठल मंदिर विकास आराखड्यातील पुढील कामे हाती घेण्यासाठी तरतूद केली आहे. या निर्णयाचे विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी स्वागत करून मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले आहेत.
येथील पुरातन विठ्ठल मंदिराला मूळ स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी राज्य शासनाने भारतीय पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून जतन आणि संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी ७३ कोटी रुपयांचा निधीही दिला आहे. या निधीतून मुख्य मंदिरातील कामे पूर्ण केली आहेत. अजून काही कामे प्रगतिपथावर आहेत. उर्वरित कामांसाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या कामातून मंदिरातील बालाजी मंदिर, नामदेव पायरी सुशोभीकरण आदींसह इतर कामे केली जाणार आहेत.
याबाबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना विचारले असता, ते म्हणाले, पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख श्रद्धास्थान असून, दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मंदिर विकास आराखड्यातील पुढील कामांमुळे भाविकांसाठी अधिक सुकर, सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होईल. मंदिर समिती राज्य शासन व संबंधित विभागांच्या समन्वयातून ही कामे नियोजनबद्ध व गतीने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. मंदिर समितीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक यांचे सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे निधीची तरतूद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com