स्वातंत्र्य दिनानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

स्वातंत्र्य दिनानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
Published on

UPR26B08533
पंढरपूर : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल मंदिरात केलेली फुलांची आकर्षक सजावट.

स्वातंत्र्य दिनानिमित्ताने
श्री विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट

पंढरपूर, ता. १६ : ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी (ता. १५) श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाचे उपरणे परिधान करण्यात आल्याने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत होते.
पुणे येथील श्रीमंत मोरया प्रतिष्ठानतर्फे सेवाभावी तत्त्वावर मंदिरात मोफत फुलांची सजावट करण्यात आली. यासाठी विविध प्रकारच्या सुमारे दोन टन फुलांचा वापर करण्यात आला. यात गुलाब, ऑर्किड, शेवंती, झेंडू, जिप्सो, जरबेरा, ब्लू डेजी आदी फुलांचा समावेश होता. मंदिराचे प्रवेशद्वार, चौखांबी व सोळखांबी या भागात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि भक्तनिवास येथे तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com