पंढरपूरकरांवर कृत्रिम जलसंकट येण्याची शक्यता

पंढरपूरकरांवर कृत्रिम जलसंकट येण्याची शक्यता

Published on

पंढरपूरकरांवर कृत्रिम जलसंकट येण्याची शक्यता

नगरपालिकेकडे थकले जलसंपदाचे सहा कोटी; पाणी बंद करण्याची नोटीस

पंढरपूर, ता. २५ : नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे जलसंपदा विभागाची तब्बल सहा कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुलीसाठी जलसंपदा विभागाने नगरपालिकेला तगादा लावला आहे.
पाणी पट्टीची थकीत रक्कम भरा, अन्यथा पाणी पुरवठा बंद केला जाईल अशी नोटीसही पालिकेला दिली आहे. दरम्यान आज जलसंपदा विभागाने पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काही पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर जलसंपदा विभागाने सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. पालिकेने थकबाकी वेळेत भरली नाही तर ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शहरातील नागरिकांवर जलसंकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. चार ते पाच वर्षांपासून नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे जलसंपदा विभागाची सुमारे सहा कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समजते. थकबाकी वसुली संदर्भात जलसंपदा विभागाने नगरपालिकेला वेळोवेळी तोंडी व लेखी कळवले आहे.
त्यानंतर नगरपालिकेने मागील वर्षी त्यातील काही रक्कम भरली आहे. उर्वरित थकीत रक्कम मोठी असल्याने जलसंपदा विभागाने आता थेट पालिकेचा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.

तोडगा काढण्याची मागणी
पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे दररोज हजारो भाविक येतात. येणाऱ्या भाविकांची व शहरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने वेळेत तोडगा काढावा अशी मागणी माजी पाणी पुरवठा समितीचे सभापती विक्रम शिरसाट यांनी केली आहे.
...
कोट-
जलसंपदा विभागाचे अधिकारी आज पाणी पुरवठा बंद करण्यासाठी आले होते. परंतु आम्ही त्यांना मार्च अखेर पर्यंत टप्प्या टप्प्याने थकबाकी भरू. पाणीपुरवठा बंद न करण्याची विनंती केली आहे.
- महेश रोकडे, मुख्याधिकारी पंढरपूर नगरपालिका
....
कोट-
पंढरपूर नगरपालिकेकडे जलसंपदा विभागाची सुमारे साडेसहा कोटी रुपयांची थकबाकी आहे. आता सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर मात्र पाणीपुरवठा बंद केला जाईल.
- गणेश कथले, कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com