पंढरपूर- माझा प्रभाग माझे व्हीजन

पंढरपूर- माझा प्रभाग माझे व्हीजन

Published on

लोगो : पंढरपूर नगरपालिका
---
UPR26B07552
महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार
पंढरपूर : पंढरपूर शहरातील मध्यवर्ती असा प्रभाग क्रमांक दहा आहे. माझ्या प्रभागात पार्किंगची मोठी समस्या आहे. जुन्या बस स्थानकासमोर व महावीर नगर अशा दोन ठिकाणी सुसज्ज वाहनतळ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेकडे प्रस्ताव दिला आहे. लवकरच हे काम हाती घेण्यात येईल. प्रभागामध्ये कष्टकरी लोकांची संख्या अधिक आहे. सर्वसामान्य लोकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, ड्रेनेज, पथदिवे अशा मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी माझे प्रमुख प्राधान्य राहणार आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी जाते. त्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी या भागात सिमेंट काॅंक्रिटचे रस्ते तयार करण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील. प्रभागात पाच ठिकाणी ओपन प्लाॅट आहेत. त्या ठिकाणी लहान मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी बाग तयार करण्याचा प्रस्ताव पाठवणार आहे. प्रभागातील महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे. तरुणांसाठी नोकरी मार्गदर्शन व मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. शिवाय प्रभागात वर्षातून दोन वेळा आरोग्य शिबिर घेऊन सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
- साधना धोत्रे, नगरसेविका, पंढरपूर नगरपालिका
-----
UPR26B07551
चंद्रभागा स्वच्छतेसाठी प्रयत्न करणार
पंढरपूर : माझ्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रामुख्याने विठ्ठल मंदिर व परिसराचा समावेश आहे. चंद्रभागा नदीचा काही भाग येतो. चंद्रभागा स्वच्छतेवर अधिक भर देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. तसेच प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी मी जास्तीत जास्त वेळ देण्याचा संकल्प केला आहे. त्या दृष्टीने कामाला सुरवात देखील केली आहे. ‘माझा प्रभाग - आदर्श प्रभाग’ ही संकल्पना हाती घेतली असून, यामध्ये स्थानिक नागरिक व तरुणांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. लोकसेवक म्हणून चांगल्या कामांना प्राधान्य दिले जाईल. प्रभागातील तरुणांना उद्योग- व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध मेळावे व शिबिर घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाईल. तसेच महिलांना लघुउद्योगाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जातील. प्रभागातील लोकांसाठी माझे घोंगडे गल्ली येथील कार्यालयात लवकरच तक्रार पेटी बसविण्यात येणार आहे. प्रभागातील ड्रेनेज, पिण्याचे पाणी, रस्ते आणि स्वच्छता या कामांवर विशेष लक्ष देऊन कुठेही लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. प्रभागातील स्वच्छतेलाही प्राधान्य दिले जाईल. ‘स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभाग’ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
- ॲड. ओंकार जोशी, नगरसेवक, पंढरपूर नगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com