अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
कारमधून गावाबाहेर नेऊन
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पांगरी, ता. २४ : पांगरी पोलिस ठाणे हद्दीतील एक गावात अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने वाहनात बसवून अपहरण करत विनयभंग व धमकी दिल्याची गंभीर घटना घडली आहे. ही घटना गुरुवार (ता. २२) सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पांगरी पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी ही १५ वर्षांची अल्पवयीन मुलीस किरण चंद्रकांत शिंदे व महेश उपाशे यांनी मुलीला जबरदस्तीने त्यांच्या ताब्यातील चार चाकी वाहनात बसवून कुर्डूवाडी रोड, बार्शी परिसरात नेले. तेथे वाहन थांबवून किरण शिंदे यांने मुलीस तू मला फार आवडतेस, तू माझ्याबरोबर पळून जाऊन लग्न कर असे म्हणून तिचे बाल मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग करून मारहाण केली. तू जर लग्नाला तयार झाली नाहीतर तुला व तुझ्या घरातील लोकांना ठार मारतो अशी धमकी दिली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

