पांगरीतील शोभाताई सोपल इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

पांगरीतील शोभाताई सोपल इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

Published on

PGR26B03481
पांगरी (ता. बार्शी) : येथील स्व. शोभाताई सोपल इंग्लिश स्कूलमधील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर.

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांकडून कलागुणांचे सादरीकरण
.....
सोपल स्कूलमध्ये विद्यार्थांनी जिंकली उपस्थितांची मने
.......
पांगरी, ता. ५ : बार्शी तालुक्यातील पांगरी येथील स्व. शोभाताई सोपल इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. शिक्षणातून विचार, विचारातून विकास या ब्रीदवाक्याला साजेसा सांस्कृतिक सोहळा उत्साह, आनंद आणि शिवगर्जनेच्या जल्लोषात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिर्ला मुंबई पोलिस ठाणेचे सहायक पोलिस निरीक्षक जरीना बागवान होत्या. पत्रकार बाबासाहेब शिंदे, गणेश गोडसे, आसिफ मुलाणी व शंकर लाखे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी श्रीराम जाधवर, अण्णासाहेब डोके, राजकुमार शिंदे, संतोष खवले, राहुल बगाडे, प्रशांत मुंडे आदी उपस्थित होते. यावेळी राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या फलक राजेंद्र वाघे, तृतीय क्रमांक समर्थ सांगळे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात संस्थापक विनायक गरड यांनी शाळेचा शैक्षणिक व सांस्कृतिक यशाचा आढावा घेतला. ‘या रे या, सारे या या’ गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरवात झाली.
सूत्रसंचालन समृद्धी कारंडे, पलक वाघे, भारती चौधरी व गौरी चौधरी यांनी केले. मुख्याध्यापिका चांदणे यांनी आभार मानले. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Marathi News Esakal
www.esakal.com