

पंचायतराज अभियानासाठी पांगरी ग्रामपंचायतीची पाहणी
पांगरी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने पांगरी ग्रामपंचायतीची नांदेड जिल्हा परिषदेकडील तपासणी समितीने भेट घेऊन ग्रामपंचायत प्रशासन व विविध विकासकामांची सखोल पाहणी केली. तपासणी पथकात नांदेड जिल्हा परिषदेचे मुसळे, कोकणे, अमित शिंदे, मारुती चिलपिपरे आणि किरण पांडागळे यांचा समावेश होता. यावेळी सरपंच मनिषा धस, उपसरपंच प्रमिला नारायणकर, शहाजी धस, सदस्य गणेश गोडसे, डॉ. विलास लाडे, धनंजय खवले, रमेश काकडे, निलकंठ कदम, पांडुरंग निकम, बाबा गोडसे, मुख्याध्यापक दत्तात्रय गोडसे, ग्रामविकास अधिकारी दर्शन मंडलिक, उमेश गाढवे, अंगणवाडी सेविका तसेच कर्मचारी उपस्थित होते.
समितीने ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजासह स्वच्छता, पाणीपुरवठा, कर वसुली, डिजिटल सेवा, ग्रामविकास योजना, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. समितीच्या सकारात्मक अभिप्रायामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित केलेल्या प्रयत्नांची ही पोचपावती असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.