पुळूजमध्ये पोलिसांनी केली 13 वासुरांची सुटका

पुळूजमध्ये पोलिसांनी केली 13 वासुरांची सुटका

Published on

UPR26B07512
पुळूज (ता. पंढरपूर) : येथे पोलिसांनी खाटकाच्या तावडीतून सुटका केलेली वासरे.
---
कत्तलीसाठी डांबलेल्या
१३ वासरांची सुटका
पुळूज येथे पंढरपूर पोलिसांची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २० : कत्तलखान्यात नेण्यासाठी डांबून ठेवण्यात आलेल्या १३ वासरांची गुरुवारी (ता. १९) मध्यरात्री पोलिसांनी खाटकाच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे १३ मुक्या प्राण्यांचे प्राण वाचले. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गंगाराम वाघमोडे याच्याविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुळूज येथील शारदानगर भागात एका जाळीत १३ वासरे अन्न- पाण्याविना बांधून ठेवण्यात आली असून, त्यांना कत्तलीसाठी नेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती गोरक्षक श्री. घाटे व मानस परिचारक यांनी दूरध्वनीवरून पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पथक घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असता, एका जाळीत १३ गायींची वासरे बांधलेली आढळली. त्या ठिकाणी चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचेही निदर्शनास आले.
पुढील तपासात पुळूज येथील साहेबराव वाघमोडे हा वासरे कत्तलीसाठी नेण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. मानस परिचारक यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com