
प्रसाद कानडे
पुणे : स्थानकावर गर्दी झालीय, एखाद्याला वैद्यकीय मदत हवीय, आणीबाणीची स्थिती उद्भवलीय, तर त्याची चिंता बाळगू नका. कारण रेल्वे बोर्डाने मोठ्या स्थानकांवर ‘पॅनिक बटण’ची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ते दाबल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट मिळेल. सीसीटीव्हीच्या मदतीने तत्काळ तिथे रेल्वे पोलिस दलाचे (आरपीएफ) पथक पोचेल. संबंधित प्रवाशांना आवश्यक ती मदत दिली जाईल. पुण्यासह पिंपरी चिंचवड स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पॅनिक बटन’ कार्यान्वित केले जात आहे. आरपीएफ विभागाने त्यासाठी सर्वेक्षणदेखील सुरू केले आहे.