मुळशी : बिबट्याच्या दर्शनामुळे मुगावड्यामध्ये घबराट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

मुळशी तालुक्‍यातील पौड गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुगावडे गावाच्या शिवारात पुन्हा बिबट्याचे दर्शन घडले. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच करमोळी येथे सायंकाळी 6 वाजता बिबट्या नागरिकांना दिसला होता. त्याचाच पुन्हा प्रत्यय आज (ता. 29) सकाळी 7 वाजता मुगावडे येथे आला. 
 

कोळवण : मुळशी तालुक्‍यातील पौड गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुगावडे गावाच्या शिवारात पुन्हा बिबट्याचे दर्शन घडले. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच करमोळी येथे सायंकाळी 6 वाजता बिबट्या नागरिकांना दिसला होता. त्याचाच पुन्हा प्रत्यय आज (ता. 29) सकाळी 7 वाजता मुगावडे येथे आला.

तालुक्‍यातील वनसंपदेच्या ऱ्हासामुळे वन्यजीवांचा सुरक्षित अधिवास धोक्‍यात आला आहे. तृणभक्षक प्राण्यांची व जंगलातील पाणवठ्यांची संख्या घटल्यानेही भक्षाच्या शोधात हे वन्यजीव आपला मोर्चा गावांकडे वळवला आहे. याबाबत वन विभागाला मुगावडे गावाचे पोलिस पाटील चैतन्य वाकणकर यांनी माहिती दिली. याची दखल घेत वन विभागाचे वनरक्षक एन. आर. शेलार, एम. एस. हिरेमठ, पि. ए. कासोळे, एस. ए. साबळे, के, एस पाटील यांनी मुगावडे परिसरात नागरिकांना भेट घेऊन त्यांना सतर्क राहण्यास सांगितले. त्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली. वनविभाग याभागात पेट्रोलिंग करणार असल्याचे वनरक्षक एन आर शेलार यांनी सांगितले. या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त त्वरित करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

कासारसाई परिसरातही बिबट्याचा वावर असल्याने येथे दोन पिंजरे वन विभागाने लावले आहे मुगावडे परिसरात दौंड येथून पिंजरे मागविण्यात आले आहेत. ते उद्या लावले जातील. 
- पोपट कापसे, वनक्षेत्रपाल, मुळशी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panic due to the appearance of leopard in Mulshi