

UPR26B07420
पंढरपूर ः कण्ववेद पाठशाळेच्या वतीने पंकज देव यांना पुरस्कार देण्यात आला.
ईश्वराच्या पूजेपेक्षा माता-पित्याच्या सेवेला जास्त महत्त्व : वेदमूर्ती पंकज देव
काण्व वेदपाठ शाळेचे पुरस्कार प्रदान;
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. १० ः आपल्या संस्कृतीत ईश्वराच्या पूजेपेक्षाही माता-पित्यांच्या सेवेला महत्त्व दिले आहे. प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंगही माता-पित्याच्या सेवेमुळे प्रसन्न होऊन भक्त पुंडलिकाला भेटायला पंढरीत आला आहे. त्यामुळे ती सेवा आधी केली पाहिजे, असे प्रतिपादन वेदमूर्ती पंकज देव यांनी केले.
पंढरपुरातील काण्ववेद पाठशाळेच्या वतीने दिला जाणारा काण्ववेद पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भााजप गटनेते भागवत बडवे महाजन, ह.भ.प. प्रसाद महाराज बडवे, पाठशाळेचे अध्यक्ष शंकर महाराज बडवे व प्रधानाचार्य शंकर महाराज गलगलकर, हिंदूमहासभा नेते अभयसिंह इचगावकर उपस्थित होते. याप्रसंगी रामसखा बडवे यांना ब्रह्मभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
पंकज देव म्हणाले, माता-पित्यांची सेवा केली तर आयुष्यात प्राप्त करण्याची इच्छा असे सर्व प्राप्त होते. धन, आयुष्य, कीर्ती व सुख याची प्राप्ती माता-पित्याच्या सेवेने होती असे पुराणात सांगितले आहे. त्यामुळे आपल्या सुसंस्कृत समाजात वृद्धाश्रमांची संख्या वाढणे हे समाजाच्या अधोगतीचे लक्षण आहे. सूत्रसंचालन त्रिंबक कुलकर्णी यांनी तर ऋषिकेश पुणेकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.