पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

Published on

पंकजा मुंडे यांच्या
हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना घेऊन लातूरकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण आल्याचे उड्डाणापूर्वीच पायलटच्या लक्षात आल्याने हे उड्डाण रद्द करण्यात आले. यामुळे पर्यायी व्यवस्था झाल्यावर त्या लातूरकडे रवाना झाल्या. वाळूज परिसरात सोमवारी प्रचारसभेत ‘मी हेलिकॉप्टरने फिरते म्हणून माझी आई देव पाण्यात ठेवते’, असे पंकजा म्हणाल्या होत्या. त्यात मंगळवारी (ता. ३) सकाळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. छत्रपती संभाजीनगर दौरा आटोपून लातूरकडे जाण्यासाठी त्या विमानतळावर आल्या. मात्र, उड्डाण सुरू होण्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे पायलटच्या निदर्शनास आले. खबरदारी म्हणून उड्डाण तत्काळ थांबवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com