
पुणे : पानशेत आणि खडकवासला धरणग्रस्तांचे दौंड तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी पुनर्वसन करण्यात आलेल्या वसाहतीतील रहिवाशांना आता प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. तसेच, त्यांच्या गावठाणाचा समावेश ग्रामपंचायतींच्या हद्दीत करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून असलेले त्यांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.