तळेगाव ढमढेरे येथील पेपर विक्रेत्यांचा पत्नीसह अपघातात मृत्यू

तळेगाव ढमढेरे येथील सकाळ पेपर विक्रेते श्री. दत्तात्रय उत्तरेश्वर झळके व त्यांच्या पत्नी सौ. सुवर्णा दत्तात्रेय झळके यांचे आज अहमदनगर येथे अपघाती निधन झाले.
Dattatray Jhalake and Suvarna Jhalake
Dattatray Jhalake and Suvarna Jhalakesakal
Summary

तळेगाव ढमढेरे येथील सकाळ पेपर विक्रेते श्री. दत्तात्रय उत्तरेश्वर झळके व त्यांच्या पत्नी सौ. सुवर्णा दत्तात्रेय झळके यांचे आज अहमदनगर येथे अपघाती निधन झाले.

तळेगाव ढमढेरे - तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील सकाळ पेपर विक्रेते श्री. दत्तात्रय उत्तरेश्वर झळके (वय ५१) व त्यांच्या पत्नी सौ. सुवर्णा दत्तात्रेय झळके (वय ४८) यांचे आज दुपारच्या सुमारास अहमदनगर येथे अपघाती निधन झाले.

आज सकाळी तळेगाव ढमढेरे येथे पेपरचे वितरण करून श्री. झळके पत्नीसह अहमदनगरकडे दुचाकीवर कार्यक्रमानिमित्त नातेवाईकाकडे गेले होते. अहमदनगर येथील कल्याण बायपास कांदा मार्केट जवळ एका भरधाव टॅंकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघांनाही गंभीर दुखापत होऊन दत्तात्रय झळके व त्यांच्या पत्नी सुवर्णा झळके यांचा जागीच मृत्यू झाला.

श्री. झळके हे तळेगाव ढमढेरे येथील आयडीबीआय बँकेत कर्मचारी होते. अतिशय मनमिळाऊ स्वभाव व सर्वांना सकाळी पेपरचे वितरण करून ते बँकेत नोकरीला जात होते. तसेच त्यांच्या पत्नीही पेपर वितरणाचे काम करीत होत्या. श्री झळके यांच्या मागे आई-वडील, दोन भाऊ, दोन विवाहित मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

दत्तात्रेय झळके व सुवर्णा झळके यांच्या अपघाती मृत्यूमुळे तळेगाव ढमढेरे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसरात शोकळा पसरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com