पुणे - ‘मोह मोह के धागे’ या हृदयस्पर्शी सुरांनी रसिकांच्या मनात घर केलेले लोकप्रिय गायक पापोन पुण्यात पहिल्यांदाच थेट सादरीकरण करणार आहेत. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे २३ मे रोजी आयोजित ‘पापोन -लाइव्ह इन कॉन्सर्ट’ या खास मैफिलीत पापोन यांच्या अलवार, जिव्हाळ्याच्या सुरांची जादू अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. संगीतप्रेमींसाठी ही एक संस्मरणीय सायंकाळ ठरणार आहे.