
Domestic Violence
sakal
पारगाव : अवसरी बुद्रूक (ता. आंबेगाव) येथील स्वीटी अक्षय बागल (वय २७) हिचा व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू हा बिबट्याला घाबरल्यामुळे नव्हेतर पतीच्या मारहाणीमुळे झाला. याप्रकरणी पतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मंचर पोलिसांनी त्यास अटक केली आहे. खेड (राजगुरुनगर) न्यायालयाने त्याला तीन दिवसांची (शुक्रवार, ता. १७ पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे.