पुणे - विशेष मुलांचे संगोपन करणे म्हणजे पालकांसाठी एक दिव्यच असते. कारण या मुलांना प्रत्येक वेळी कायम एका काळजीवाहू व्यक्तीची गरज पडते जी घरात आई किंवा वडील यांना पार पाडावी लागते. त्याचबरोबर दररोज त्यांना घरापासून दूर व वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या थेरपी, विशेष शाळांमध्ये घेउन जावे लागते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांची सुरक्षितता असते.
परंतु, या सर्व सुविधा जर त्यांना त्यांच्या राहत्या घराच्या येथील टाउनशिपमध्ये मिळाल्या तर? होय, हे शक्य झाले आहे ‘परांजपे स्कीम्स’ यांनी भूगाव येथील निसर्गाच्या सानिध्यात उभारलेल्या ‘स्वनिकेतन’ या फाॅरेस्ट ट्रेल टाउनशिपमध्ये! तारांगण संस्थेच्या मदतीने विशेष मुलांना एकाच छताखाली सुविधा देणारी व सामाजिक भान जपणारी ही भारतातील पहिलीच टाऊनशिप ठरली आहे.